वचनपूर्ती करणारे राजे म्हणजे राजर्षी शाहू छत्रपती
- प्रा. (डॉ.) गिरीश मोरे
रुकडी (दि. २६-६-२०२५ सादिक मुल्ला/प्रतिनिधी) 'आपल्या प्रजेची सर्व बाबतीतकाळजी घेणारा एकमेव राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय. त्यांनी नेहमीच प्रजेच्या हिताचे निर्णय घेतले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. आपल्या राज्याच्या विकासासाठी प्रजेला केवळ आश्वासने न देता ती पूर्ण केली. अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव यासाठी प्रयत्नशील राहिले. शेती बारामाही पिकावी यासाठी राधानगरी धरणाची निर्मिती केली.', असे मत प्रा. (डॉ.) गिरीश मोरे यांनी व्यक्त्त केले. ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय आणि राजर्षी शाहू जेष्ठ नागरिक कल्याणकारी सेवा संस्था, रुकडी यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राजर्षी शाहू जयंती महोत्सव कार्यक्रमात वचनांची पूर्तता करणारे राजर्षी शाहू छत्रपती या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष अण्णा चौगुले होते. स्वागत व प्रस्ताविक श्री. विलास देसाई यांनी केले. श्री. सुभाष देसाई अध्यक्ष भाषणात म्हणाले आपल्या प्रजेत मिसळून त्यांच्या सुखदुःखात शाहू महाराज सहभागी होत, त्यामुळे राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकराजे होते. आभार प्रा. (डॉ.) खंडेराव शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. अशोक पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य डॉ.प्रशांतकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक शास्त्रे व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.