*33वर्षांनी झाला महात्मा गांधी विद्यालय रूकडी व लोकनेते कै खासदार बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट सन 1990 बॅचचा स्नेह मेळावा*
दि.३०/४/२०२३रोजी रामलिंग येथील संस्कृती रिसॉर्टवर सन१९९० बँचचा स्नेह मेळावा संपन्न झाला. सकाळी८ वाजता महात्मा गांधी विद्यालय रूकडी येथे सर्व माजी विद्यार्थी एकत्र झाले व तिथून रामलिंग येथील संस्कृती रिसॉर्टकडे प्रयाण झाले.
प्रथम सरस्वतीची पूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले .त्यानंतर मा.उप सरपंच शितल खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मनोज माळवदकर यांनी गीत सादर केले. त्यानंतर सर्व मित्रांनी आपली ओळख करून दिली. त्यामध्ये थोडक्यात मनोगतही व्यक्त करण्यात आले. एकूण 103 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. नवी दिल्ली, मुंबई ,पुणे ,पंढरपूर व मंगळवेढा इथून माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते .३३ वर्षांनी झालेला हा मेळावा खरंच एक अविस्मरणीय मेळावा म्हणावा लागेल. नंतर फनी गेम्स् व जुन्या आठवणींना उजाळा ,गुरुजनांची आठवणी मित्रांनी सांगितल्या.
राजू लोखंडे ,अनिल गायकवाड, शितल खोत, शितल पाटील( काका) मनोज माळवतकर ,डॉ. शैलेश यांनी कराओके ट्रॅकवर अतिशय सुंदर गीतं सादर केली. तसेच काही मित्रांनी आपण आपल्या ग्रूपच्या वतीने सामाजिक बांधिलकी या नात्याने सामाजिक कार्य करु . त्याच बरोबर आपल्या मित्रांच्या मध्ये असणाऱ्या अडीअडचणी व सुखदुःखामध्ये आपण सहभागी व्हावे. याविषयी विचार झाला. सर्वांना आठवण म्हणून ग्रुपच्या वतीने स्मृतीचिन्ह देण्यात आले व आपली माजी विद्यार्थिनी पाटील हिने सर्व विद्यार्थ्यांना स्नेहवस्त्र भेट दिले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रुकडी उप. सरपंच शितल खोत डॉ. शैलेश, शीतल पाटील (काका) शितल पाटील ,दिपक पाटील,वर्धमान चौगुले,अँड सुरेश पाटील, मोहन यादव, शितल चौगुले रफिक ,दिलावर, अजित पाटील, इ.मित्रांचे सहकार्य
लाभले.
पुढील वर्षीचा स्नेहमेळावा व त्या मेळाव्यात होणारा संपूर्ण खर्च शितल पाटील (काका) यांनी आपल्या स्वतःच्या सोनाई फार्म हाऊस वर करण्याचे जाहीर आवाहन केले.
कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
उन्हाळा असूनही हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरणाचा अनुभव या मेळाव्यात आला.
अस्सल महाराष्ट्रीय शाकाहारी खरडा, दही ,भाकरी इ....... भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला.