रुकडीत धावत्या एसटी बसने घेतला पेट, KMT चालत्या बसला आग

साप्ताहिक अभिनव मराठी

 रुकडीत  धावत्या एसटी बसने घेतला पेट, KMT चालत्या बसला आग 

 धावत्या एसटी बसने घेतला पेट

प्रतिनिधी - इरफान पेंढारी


 MH09-CV-0336  या क्रमांकाची बस कोल्हापूरहून माणगावच्या दिशेला जात असताना, मेन रोड रूकडी येथे, साईनाथ हॉस्पिटल जवळ या बसने आग पकडली , इंजन मधून धूर आणि इंजिन जास्त गरम होत असल्याने ही बाब चालक व प्रवाशांच्या लक्षात आली तात्काळ सर्व प्रवासी खाली उतरल्याने कोणत्याही प्रकारची मानवी हानी झाली नसून बसचे नुकसान झाले आहे. 

यावेळी कै. संभाजीराव माने युवक संघटना (बागडी गल्ली ) ,या गणेशोत्सव मंडळाचा महाप्रसाद चालू असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मंडळाच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. यावेळेला मंडळातील कार्यकर्ते व गावातील नागरिक धावून आले आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आग आटोक्यात आणून, संबंधित बसला धक्का मारून मराठी शाळेच्या पटांगणावर पार्क करण्यात आले,

यावेळेला साई सर्विस मध्ये असणारे , अनिल बागडी  (पाटील) यांनी यांनी इंजन मधून निघणारे सर्व कनेक्शन कट केल्यामुळे मोठी हानी टळली आणि बसला लागलेली आग आटोक्यात आली


Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.