प्रतिनिधी -इरफान पेंढारी
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील रुकडी हे गाव विविध गुणधर्माने नटले आहे. या गावाला ऐतिहासिक तसेच राजकीय पार्श्वभूमी हे गाव नेहमीच चर्चेत असतं.पण आता या गावांमध्ये एक वेगळाच पद्धतीची गणेश उत्सव आगमन मिरवणुकीचे दर्शन झाले
गणेश चतुर्दशीच्या दिवशी या गावांमध्ये अनुक्या पद्धतीने गणेश उत्सव आगमन मिरवणूक झाली. श्री काशिनाथ शिनगारे व श्री बंदेनवाज मोकाशी, हे दोघे मित्र असून काशिनाथ शिनगारे यांनी आपल्या गणपती आगमन मिरवणुकीचा मान आपले मित्र श्री बंदेनवाज मोकाशी, यांना दिला यावेळेस ढोल ताशांच्या गजरामध्ये ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक ( शिवतीर्थ) रूकडी येथून सुरू होऊन श्री काशिनाथ शिनगारे यांच्या घरापर्यंत पोहोचली त्यानंतर गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली, विविध विविध मध्ये एकता असणार आहे याचा आदर्श सर्वत्र घेतला पाहिजे अशी चर्चा होत आहे