कै. सौ. हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत तसेच जळगाव येथे झालेल्या अंतरविभागीय स्पर्धेत कै. सौ. हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, निमशिरगाव च्या विद्यार्थ्यांनी
कब्बडी आणि खोखो या क्रीडा प्रकारामध्ये यश मिळवले. विद्यापीठ कबड्डी संघाच्या कर्णधार पदी रुपेश शिरगुप्पे, तृतीय वर्ष बीएचएमएस तसेच महिला कब्बडी संघात मैथिली पाटील प्रथम वर्ष बीएचएमएस यांची निवड झाली त्याचबरोबर महिला खो-खो संघात सरस्वती सुर्यवंशी द्वितीय वर्ष बीएचएमएस, श्रेया नाईक , आरती शेंबडे व पुरुष खोखो संघामध्ये रितेश गावडे प्रथम बीएचएमएस यांची निवड झाली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेमार्फत अभिनंदन करण्यात आले. त्यांना संस्थेचे चेअरमन डॉ. सुकुमार मगदूम, प्राचार्या डॉ. शुभांगी मगदूम, संस्थेचे विश्वस्त तेजस मगदूम , ॲकडमिक डायरेक्टर डॉ. विद्याधर खनाज तसेच सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून शारदा पाटील यांनी काम पाहिले.