रुकडी, दि. 1 (इरफान पेंढारी) : रुकडी येथील पंचगंगा चौक ते हजरत पीर राजेबागस्वार दर्ग्या पर्यंत हजरत पीर सूर्यापन दर्गा मार्गे जाणारा रस्त्याचे लोकार्पण खासदार धैर्यशील माने (दादा) यांच्याहस्ते झाले. रुकडी गावातील हा मुख्य रस्ता असून रुकडी ऊरसाचे औचित्य साधून या रस्त्याचा लोकार्पण सोहळा झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी खासदार धैर्यशील माने (दादा),
तसेच लोकनियुक्त सरपंच राजश्री संतोष रूकडीकर व उप सरपंच मालती दिलीपराव इंगळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार माजी लोकनियुक्त सरपंच रफिक कलावंत व सर्व नागरिक उपस्थित होते