26.06.2025: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त काकासाहेब माने हायस्कूल रूकडी येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांचे शाहू महाराजांच्या विषयीचे मनोगत आयोजित केले होते या प्रसंगी आदरणीय श्री संजय वारके सर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शिक्षण विषयक तळमळ, समाज सुधारणा, आरक्षण विषयक समानतेचे धोरण, कलात्मक दृष्टी असे विविध पैलू रयतेच्या राजाचे वेगळेपण आपल्या विचारातून व्यक्त केले. आणि इयत्ता पाचवीतील विद्यार्थी वीरवर्धन माने ,समर्थ परीट ,पार्थ कोळी आणि श्लोकराज जाधव यांनी शाहू महाराजांच्या विषय आपले मत व्यक्त केले अध्यक्ष आदरणीय सौ. पद्मजा पाटील मॅडम यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला तर सौ भारती मोरे मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली यावेळी कार्यक्रमासाठी श्री दिगंबर शिणगारे सर व श्री अमर कांबळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती