Posts

हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

साप्ताहिक अभिनव मराठी

    हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न




     महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा हातकणंगले यांच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा       कै.भा.वा. शिंपी गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व महिला कार्यकारणी मेळावा*  संजय घोडावत कॉलेज अतिग्रे येथे दिनांक 15/ 4 /2025 रोजी हातकणंगलेचे विधानसभा आमदार डॉक्टर अशोकराव माने (बापू) यांच्या उपस्थित उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.

 सदर कार्यक्रमास संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रेचे संचालक माननीय श्री विराट गिरी साहेब , हातकणंगले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री रवींद्रनाथ चौगुले साहेब ,शिक्षक समितीचे राज्य नेते मा. श्री ज्योतीराम पाटील ,पुणे विभागीय अध्यक्ष मा. श्री अर्जुन पाटील ,शिक्षक समिती जिल्हा अध्यक्ष प्रमोद तौदकर ,राज्य महिला अध्यक्ष सौ वर्षा केनवडे यांची मनोगते झाली. यात शिक्षक समिती शाखा हातकणंगले यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारा कार्यक्रमाचे आपल्या भाषणामध्ये कौतुक केले. तसेच शिक्षकांच्या प्रश्नासाठी नेहमीच रस्त्यावरील लढाई करणाऱ्या शिक्षक समितीच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले. शिक्षकांच्या पाठीवर थाप देऊन काम करणारी ही संघटना एक आगळीवेगळी संघटना आहे असा उल्लेख करण्यात आला.या कार्यक्रमात हातकणंगले तालुक्यातील 30 आदर्श शिक्षकांचा सत्कार मानपत्र देऊन माननीय आमदार अशोकराव माने (बापू )व उपस्थित सर्व राज्य, जिल्हा ,तालुका शिक्षक समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थित सर्व शिक्षकांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करण्यात आला.



       सदर कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय कुंभार व जिल्हा संपर्कप्रमुख श्री मारुती पाटील यांनी केले

          कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये पुणे विभागीय अध्यक्ष ,मा. चेअरमन विद्यमान संचालक शिक्षक बँक श्री अर्जुन पाटील यांनी हातकणंगले तालुका शिक्षक समितीच्या कार्याचा उंचावत जाणारा आलेख सर्वांसमोर मांडला त्याचबरोबर समितीची बालक, पालक व शिक्षक यांच्या बाबतीत संघटनेची असलेली भूमिका आपल्या ओघवत्या भाषणामध्ये स्पष्ट केली

     यानंतर हातकणंगले तालुका शिक्षक समिती महिला मेळाव्यामध्ये शिक्षक समिती महिला आघाडीची घोषणा तालुका अध्यक्ष श्री सचिन कोल्हापुरे यांनी सर्व जिल्हा प्रतिनिधींच्या सहमतीने केली.

    या नुतन निवडी मध्ये सौ वसुंधरा डांगरे ,(जिल्हा उपाध्यक्ष) .सौ वंदना शिंदे (महिला तालुकाध्यक्ष ).सौ स्वाती देसाई (महिला तालुका सरचिटणीस). सौ माधुरी घस्ते (महिला तालुका कार्याध्यक्ष) ,सौ माया सोनटक्के (महिला तालुका कोषाध्यक्ष), सौ अनिता कुंभार (तालुका उपाध्यक्ष ),सौ योजना देशमुख (तालुका उपाध्यक्ष)सौ. सुवर्णा अवघडी( तालुका संपर्कप्रमुख), सौ मनीषा कोळी, सौ सरला प्रधान ,सौ चंद्रभागा देशमुख यांची विभागीय उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.

            या कार्यक्रमासाठी जिल्हा नेते श्रीकृष्णात कारंडे ,राज्य आघाडी प्रमुख श्री सुधाकर सावंत ,शिक्षक बँक संचालक श्री राजेंद्र पाटील, श्री रामदास झेंडे, श्री शिवाजी बोलके, श्री बाबुराव परीट ,श्री रिजवान चमन शेख ,शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन श्री सुरेश कोळी, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे संचालक श्री बाजीराव पाटील, पुणे विभागीय प्रसिद्धीप्रमुख श्री हरिदास वर्णे, महिला जिल्हा अध्यक्ष सौ संगीता अस्वले ,जिल्हा पदाधिकारी श्री प्रभाकर कमळकर, श्री गणपती मांडवकर ,श्री सुनील कुंभार ,श्री संजय कुंभार ,श्री धनाजी शेवाळे, श्री मारुती पाटील, श्री प्रकाश पाटील, श्री आनंदा गवळी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे शिक्षक समितीचे अध्यक्ष, सरचिटणीस व हातकणंगले तालुक्या चे सर्व पदाधिकारी, कार्यकारणी उपस्थित होते. 

     कार्यक्रमाचे आभार तालुका सरचिटणीस श्री संजय मोरे यांनी व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शशिकांत खांडेकर ,श्री देवदत्त कुंभार ,श्री सागर पाटील यांनी केले 

    या कार्यक्रमात हातकणंगलेचे पदाधिकारी श्री महादेव गायकवाड, श्री राजीव कोरे, श्री सागर पाटील, श्री विनायक तावरे, श्री भिमराव पाटील, श्री शब्बीर मोमीन, श्री अनिल गायकवाड ,श्री बालाजी पांढरे ,श्री माणिक कागवाडे ,श्री सुदर्शन पाटील ,श्री अनिल वीर ,श्री नंदकुमार पिराई ,श्री भूपाल मंडगे, श्री प्रकाश धातुंडे ,श्री सहदेव हरगे ,श्री वजीर मानकापुरे ,श्री देवदत्त कुंभार ,श्री राजेश पाटील ,श्री सुहास पाटील ,श्री जयेंद्र लाटणे श्री धनाजी पोफले, श्री नरेंद्र कनोजे ,श्री प्रकाश सुतार,श्री संदीप कोळी ,श्री सुनील निंबाळकर ,श्री श्रीकांत गुंडवडे ,श्री सुनील सोनवणे ,श्री राजाराम जाधव श्री संजय कांबळे, श्री सचिन शिंदे ,श्री सतीश जयकर ,श्री सागर कुंभार ,श्री प्रकाश खरात ,श्री गोपाल लोंढे श्री दत्ता सोलंकर ,श्री श्रीकांत गुंडवडे ,श्री संजय बामणे ,श्री वैभव डावरे ,श्री गणेश आंधळे ,श्री दत्तात्रय शिंदे श्री सुशांत काटे , श्री संतोष कोळी ,श्री शिवाजी लोखंडे ,श्री बाबासो अवघडी ,श्री अनिल नलवडे ,श्री आनंदा घाटगे ,श्री गोपाळकृष्ण गुंमठाणवर ,श्री राहुल शेंडगे,श्री शिवाजी पाटील, श्री प्रवीण पिसे श्री संदीप आळंदे, श्री शरद कुंभार,श्री अरुण कुंभार, श्री संजय बनकर,श्री सलीम मुल्ला,श्री अशोक जाधव,श्री नितीन कमते ,श्री सतीश रणशिंगे ,श्री लक्ष्मण जाधव ,श्री कुमार हेगडे,श्री उमेश हारोलीकर ,श्री तुकाराम माने श्री सुशांत काटे ,श्री पारिस पाटील इत्यादी कार्यकारणी सदस्य शेकडो शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.