राष्ट्रप्रेम कला क्रीडा अकॅडमी रूकडी चे शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश.
रुकडी-इरफान पेंढारी
राष्ट्रप्रेम कला क्रीडा अकॅडमी,रुकडीच्या खेळाडूंनी शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
सिंधुदुर्ग येथे झालेल्या विभागीय सायकलिंग स्पर्धेमध्ये१) कु.दानिश निखतपरवीन जमादार(रा. सांगली) 17 वर्षाखालील वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक, २)कु.हुजैफा अमानुल्ला मुल्ला(रूकडी)17 वर्षाखालील वयोगटांमध्ये द्वितीय क्रमांक तर ३)कु.अथर्व अतुल बसुगडे(रूकडी)14 वर्षाखालील वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच, यांची गोंदिया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये १) कु.माहीन अंजूमशहा मकानदार(रूकडी) फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये 10-0 च्या फरकाने द्वितीय क्रमांक मिळवला तर २) कुमारी अफरोजा अल्ताफ मकानदार,राज्यस्तरीय कुस्तीगीर संघटनेमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वारणानगर येथे झालेल्या शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये १)कु.प्रणव संतोष शिनगारे यांने 400 मीटर धावणे स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला तर तर 2)कुमारी.सिद्धी जाधव ने 100 मीटर धावणे स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.
या खेळाडूंना राष्ट्रप्रेम कला क्रीडा अकॅडमी रुकडीचे
प्रशिक्षक- शाहीदअहमद शब्बीर जमादार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते प्रशिक्षक -नदीम मुजावर (राष्ट्रीय खेळाडू अकॅडमी संस्थापक अध्यक्ष) यांचे सहकार्य लाभले. खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.